पैठण, (प्रतिनिधी) : पैठण एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेल्या बालानगर येथे गणि सांडू शेख यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना तत्काळ कारवाई करण्यासाठी पथक घटनास्थळी रवाना केले.
या पथकाने छापा टाकला. येथे ५०० किलो गोमांस व गोमास कापण्याचे साहित्य जप्त व गोमांस वाहतूक करण्यासाठी वापरणाऱ्या दोन दुचाकी दुचाकी असे एकूण १ लाख ७० हजार ८५० रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गणी सांडू शेख, महमूद
सत्तार शेख, मुजाहिय गणेश शेख, मुस्तकीय गणी शेख (रा. बालानगर तालुका पैठण) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक गवित जगताप, पो. ह. दिनेश दाभाडे, पो. ह. करतारसिंग सिंगल, पो. ना. ज्ञानेश्वर भवर, पो. कॉ. अंकुश रहाटवाड यांनी केली आहे.












